लंडन - ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांना कोरोनाची लागण ( Queen Elizabeth Tested Covid Positive ) झाल्याची धक्कादायक माहिती आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनस्न यांनी टि्वट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. राणींवर सध्या त्यांच्या विंडसर कॅसलमध्ये उपचार सुरू आहेत. सौम्य लक्षणं असल्याचं चिंतेच कारण नसून येत्या काही दिवसांत त्या नियमित दिनचर्या सुरू करतील, असे बकिंगहम पॅलेस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. राणी एलिझाबेथ या ९५ वर्षांच्या आहेत. राणी एलिझाबेथ द्वितीय या आपला मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स अर्थात प्रिन्स ऑफ वेल्सच्या संपर्कात आल्या होत्या. ज्यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ( PM Modi wishes UK's Queen Elizabeth II speedy recovery ) टि्वट करत ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
क्वीन एलिझाबेथ यांना चार मुले, आठ नातवंडे आणि 10 पनतू आहेत. वेल्सचे राजकुमार चार्ल्स, राजकुमारी ऐन, राजकुमार ऐंड्र्यु, यॉर्कचे ड्यूक राजकुमार एडवर्ड, वेसेक्सचे राजकुमार अर्ल एलिझाबेथ यांची चार अपत्ये आहेत. तर राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात निधन झाले होते. ते 99 वर्षाचे होते. ब्रिटीश घराणेशाहीच्या इतिहासात महाराणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप यांचा सर्वाधिक काळ चाललेला शाही संसार होता.
प्लॅटिनम ज्युबली -