महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

पळपुटा हिरे व्यापारी नीरव मोदीच्या कोठडीत २५ जुलैपर्यंत वाढ - custody

नीरव मोदीचा बचाव करणाऱ्या वकिलांनी त्याला तुरुंगात लॅपटॉप देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. या माध्यमातून मोदी त्याच्यावरील ५ हजार पानांचे भारत सरकारचे आरोपपत्र तुरुंगात वाचू शकेल, असे बचाव पक्षाचे म्हणणे होते.

नीरव मोदी

By

Published : Jun 27, 2019, 8:02 PM IST

लंडन - लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयाने पळपुटा हिरे व्यापारी नीरव मोदीच्या कोठडीत २५ जुलैपर्यंत वाढ केली आहे. पंजाब नॅशनल बँकेचे कोट्यवधी रूपये बुडवून तो फरार झाला होता. सध्या तो लंडन येथे तुरुंगात आहे. गुरूवारी नीरव मोदीला व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून लंडनच्या न्यायालयासमोर उभे करण्यात आले. २५ जुलैला पुढील सुनावणी आहे.

नीरव मोदीचा बचाव करणाऱ्या वकिलांनी त्याला तुरुंगात लॅपटॉप देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. या माध्यमातून मोदी त्याच्यावरील ५ हजार पानांचे भारत सरकारचे आरोपपत्र तुरुंगात वाचू शकेल, असे बचाव पक्षाचे म्हणणे होते. यावर न्यायालयाने 'नीरव मोदीशी संबंधित खटल्याची कागदपत्रे त्याला तुरुंगातच उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी त्याला काही सुविधा देण्यात येतील,' असे म्हटले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीलाच लंडन न्यायालयाने नीरव मोदीचा जामीनाचा अर्ज फेटाळला होता. आतापर्यंत ४ वेळा त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details