महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

लंडनमध्ये विमानतळासह ३ ठिकाणी आयईडी बॉम्ब सापडल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क - transport hubs

एक बॉम्ब हीथ्रो विमानतळावर सकाळी ९.५५ मिनिटांनी सापडला. दुसरा वॉटर्लू स्टेशनवर ११.४० वाजता सापडला. तिसरा यानंतर ३० मिनिटांनी शहर विमानतळाजवळील शहर उड्डाण कार्यालयात सापडला.

लंडन

By

Published : Mar 6, 2019, 9:43 AM IST

लंडन - हीथ्रो विमानतळ, शहर विमानतळ आणि वॉटर्लू स्टेशन येथे ३ छोटे आयईडी बॉम्ब सापडल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. लंडन पोलिसांनी ही माहिती दिली. ए४ आकाराच्या ३ वेगवेगळ्या पोस्टाच्या पांढऱ्या पाकिटांमध्ये पिवळ्या जिफ्फी बॅगमध्ये हे बॉम्ब आढळले.

एक बॉम्ब हीथ्रो विमानतळावर सकाळी ९.५५ मिनिटांनी सापडला. दुसरा वॉटर्लू स्टेशनवर ११.४० वाजता सापडला. तिसरा यानंतर ३० मिनिटांनी शहर विमानतळाजवळील शहर उड्डाण कार्यालयात सापडला.

या छोट्या बॉम्बमुळे पाकिट उघडल्यानंतर छोट्या प्रमाणात आग लागणे शक्य होते. बॉम्ब सापडल्यानंतर दहशतवादविरोधी कारवाई आणि तपास सुरू झाला. हीथ्रो आणि शहर विमानतळावरील विमानांच्या उड्डाणांवर कोणताही परिणाम झाला नाही. तसेच, कोणीही जखमी नसून कोणालाही अटक झालेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details