लंडन -ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या जोडीदार कॅरी सायमंड्स यांनी बुधवारी लंडनच्या हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन पाचव्यांदा बाबा झाले असून त्यांनी आपल्या मुलाचे खास नाव ठेवले आहे. बोरीस आणि कॅरी यांचे आजोबा आणि कोरोनाविषाणूपासून बोरीस यांचा जीव वाचवणारे डॉक्टर अशा 4 व्यक्तींचे नाव मिळून त्यांनी आपल्या मुलाचे नाव ठेवले आहे.
'विल्फ्रेड लॉरी निकोलस जॉन्सन असे मुलाचे नाव ठेवण्यात आले आहे. यात नावामध्ये विशेष म्हणजे, बोरिस जॉन्सन यांचा जीव वाचवलेल्या डॉक्टरांच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आले आहे. यामध्ये 'विल्फ्रेड' हे बोरीस यांच्या आजोबांचे आहे. तर 'लॉरी' हे कॅरी सायमंड्स यांच्या आजोबांचे तर निकोलस हे बोरीस यांचा कोरोना विषाणूपासून जीव वाचवलेले 'डॉ. निक प्राइस आणि डॉ. निक हार्ट' यांच्या नावावरून ठेवले आहे. याबाबत कॅरी सायमंड्स यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.