नवी दिल्ली -परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे दोन दिवसीय जॉर्जिया दौऱ्यावर जाणार आहेत. 9-10 जुलै या असा दौन दिवसीय त्यांचा जॉर्जिया दौरा असणार आहे. जॉर्जियाचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री डेविड झलकालीयानी यांच्या निमंत्रणावरुन ते जॉर्जियाला भेट देतील, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी दिली.
एस. जयशंकर पहिलेच परराष्ट्रमंत्री -
स्वतंत्र जॉर्जियाला भेट देणारे एस. जयशंकर भारताचे पहिले परराष्ट्रमंत्री आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्रालयाकडून देण्यात आली. दरम्यान, त्यांच्या या भेटीदरम्यान, भारत-जॉर्जिया द्विपक्षीय संबंधाबाबत त्यांचे समकक्ष यांच्याशी ते संवाद साधतील. तसेच यावेळी ग्लोबल इंटरेस्ट आणि एकमेकांचे विभागीय विषयांसदर्भातही यावेळी चर्चा केली जाईल.
सेंट क्वीन केटेवन यांचे पवित्र रेलिक परराष्ट्रमंत्री हे जॉर्जियाचे सरकार आणि तेथील लोकांना भेट देतील. तसेच एस. जयशंकर हे सिटी ऑफ तबलीसी येथे उभारण्यात आलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. दरम्यान, या भेटीमुळे भारत आणि जॉर्जियामधील घनिष्ट आणि सौहार्दपूर्ण संबंध आणखी दृढ होतील.