युक्रेनमध्ये मारला गेलेला भारतीय विद्यार्थी पूर्णपणे निर्दोष होता. निरपराध लोकांची हत्या थांबली पाहिजे आणि चर्चा पुन्हा सुरू झाली पाहिजे. लोकांनी जगले पाहिजे, जीवनाचा आनंद लुटला पाहिजे आणि मारले जाऊ नये अशी प्रतिक्रिया भारतातील चेक रिपब्लिकचे दूतावासचे अंतरिम चार्ज डी अफेयर्स रोमन मासारिक यांनी दिली आहे.
Indian Student Killed in Ukraine Live Update : रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; प्रत्येक मिनिट मौल्यवान - राहुल गांधी - karnataka Student Killed in Ukraine
19:55 March 01
युक्रेनमध्ये मारला गेलेला भारतीय विद्यार्थी पूर्णपणे निर्दोष - रोमन मासारिक
18:28 March 01
हावेरी भाजप खासदारांनी घेतली नातेवाईकांची भेट
हावेरी येथील भाजप खासदार शिवकुमार चनाबसप्पा उदासी यांनी नवीन शेखरप्पा यांच्या नातेवाईकांची भेट घेतली.
18:15 March 01
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची प्रतिक्रिया
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, पंतप्रधानांनी नवीनच्या कुटुंबियांशी फोनवरुन संवाद साधला आहे. नवीनच्या कुटुंबियांशी माझा संपर्क आहे. नवीनचा मृतदेह भारतात आणण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करु, असे मुख्यमंत्री म्हणाले.
17:59 March 01
पंतप्रधानांनी साधला नवीनच्या वडिलांशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला युक्रेनमधील खार्किव येथे गोळीबारात मृत्यू झालेल्या नवीन शेखरप्पा या भारतीय विद्यार्थ्याच्या वडिलांशी संवाद साधला.
17:34 March 01
कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी केले नवीनच्या वडिलांचे सांत्वन
युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यात कर्नाटकाच्या विद्यार्थाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी फोन करून नवीनच्या वडिलांचे सांत्वन केले आहे. यावेळी त्यांच्या वडिलांना शोक अनावर झाला. मृतदेह आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे त्यांना सांगून त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्यांना अश्रु अनावर झाले होते.
17:12 March 01
विद्यार्थांना सुरक्षित निर्वासनासाठी धोरणात्मक योजनेची आवश्यकता - राहुल गांधी
नवीन या भारतीय विद्यार्थ्याने युक्रेनमध्ये आपला जीव गमावल्याची दुःखद बातमी मिळाली. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना. मी पुनरुच्चार करतो, भारत सरकारने तेथील विद्यार्थांना सुरक्षित निर्वासनासाठी धोरणात्मक योजनेची आवश्यकता आहे. प्रत्येक मिनिट मौल्यवान आहे.
17:05 March 01
'नवीनचा मृतदेह भारतात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार'
हावेरी जिल्ह्यातील विद्यार्थी नवीन शेखरप्पा हा युक्रेनमध्ये मरण पावला. त्यांच्या वडिलांशी बोलले झाले आहे. नवीनचा मृतदेह भारतात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. मुख्यमंत्री सेम बोम्माई यांनी सांगितले की, या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी बोलणी सुरू आहेत.
16:50 March 01
हल्ल्यात ठार झालेला नवीन घेत होता एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिक्षण -
नवीन एस. जी. (22) हा कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील चल्लागेरी गावचा आहे. त्याचे शिक्षण हे शिरालकोप्पा आणि म्हैसूर येथे झालेले आहे. नंतर एमबीबीएस शिकण्यासाठी तो युक्रेनला गेला होता. नवीनचे कुटुंबीय हे शेती करतात. त्यांचे वडील शेखरप्पा यांनी आधी यूएई आणि म्हैसूर येथे एका खाजगी कंपनीत अभियंता म्हणून काम करत होते. नंतर त्यांनी दोन एकर जमीन घेतली आणि शेतीकडे वळले.
नवीन हा शेखरप्पाचा धाकटा मुलगा होता. आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून, गरीब परिस्थितीतही खर्च कमी असल्याने कुटुंबाने त्याला युक्रेनमध्ये एमबीबीएस करण्यासाठी पाठवले. तो एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी होता.
नवीनसोबत त्याच गावातील दोन विद्यार्थीही युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. अमित आणि सुमन या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलांना देशात परत आणण्यासाठी सरकारच्या प्रतिसादाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नवीनच्या घरासमोर गावकरी शोकाकुल झाले आहेत. ग्रामस्थांनीही राजकीय नेते व अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे.
15:46 March 01
काँग्रेस नेते खासदार शशी थरुर यांनी वाहिली श्रद्धांजली
15:42 March 01
कर्नाटकातील विद्यार्थाचा युक्रेनमध्ये हल्ल्यात मृत्यू
कर्नाटकातील नवीन एस. जी. या विद्यार्थाचा रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ही माहिती त्याच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांच्या घरी शोककळा पसरली आहे.
15:10 March 01
Indian Student Killed in Ukraine : रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
कीव (युक्रेन) -युक्रेनमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू ( Indian Student Killed in Ukraine ) झाला आहे. युक्रेनमधील खार्किव येथे आज सकाळी झालेल्या मिसाईल हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्वीटकरुन याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, मंत्रालय त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
'तातडीच्या सुरक्षित मार्गाच्या अवलंब करण्याची मागणी'
ते म्हणाले की, भारताचे 'परराष्ट्र सचिव रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांना बोलावत आहेत जे अजूनही खार्किव आणि इतर संघर्ष झोनमधील शहरांमध्ये आहेत अशा भारतीय नागरिकांसाठी तातडीच्या सुरक्षित मार्गाच्या अवलंब करण्याची मागणी आम्ही करत आहोत. रशिया आणि युक्रेनमधील आमच्या राजदूतांकडूनही अशीच कारवाई केली जात आहे.'
कर्नाटकातील विद्यार्थी -
कर्नाटकातील नवीन एस. जी. या विद्यार्थाचा रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या मिसाईल हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ही माहिती त्याच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांच्या घरी शोककळा पसरली आहे.