नवी दिल्ली -पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रिबेलो द सौसा चार दिवसीय भारताच्या दौऱयावर आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मार्सेलो रिबेलो द सौसा यांची भेट घेतली. यावेळी पत्रक जारी करत भारत-पोर्तुगालदरम्यान विविध क्षेत्रांमध्ये 14 करार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पोर्तुगाल हा दक्षिण युरोपमधील महत्वपूर्ण देश आहे. गेल्या 15 वर्षामध्ये द्विपक्षीय संबंधात प्रगती झाली आहे. पोर्तुगाल आणि भारतदरम्यान असलेले द्विपक्षीय संबंध ऐतिहासिक आणि पुर्वपार आहेत. गुंतवणूक, वाहतूक, बंदरे, सांस्कृतिक, औद्योगिक शिक्षा, स्टार्टअप, पाणि-पर्यायवरण, रक्षा, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रामध्ये दोन्ही देशांनी प्रगती केली आहे. दहशतवाद हा संपूर्ण जगासाठी एक धोक असून तो त्याच्याशी लढण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवावे लागेल, असे कोविंद म्हणाले.