म्युनिक - परराष्ट्र मंत्रालयाचे मंत्री एस. जयशंकर यांनी ( External Affairs Minister S Jaishankar on India-China Ties ) शनिवारी चीन आणि भारत संबंधावर भाष्य केले. सीमा कराराचे उल्लंघन केल्याने सध्या भारत आणि चीनचे संबंध हे फार कठीण टप्प्यातून जात आहेत, असे जयशंकर म्हणाले. सीमेची स्थिती ही दोन्ही देशांमधील संबंधांची स्थिती निश्चित करेल, असेही त्यांनी अधोरेखित केले. म्युनिक सुरक्षा परिषद (MSC) 2022 ला ते संबोधित करत होते. युक्रेनवरुन नाटो देश आणि रशिया यांच्यातील वाढत्या तणावावर चर्चा करण्यासाठी म्युनिक सुरक्षा परिषदेत (MSC) जयशंकर यांनी सहभाग घेतला होता.
सीमेवर किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लष्करी फौजा तैनात न करण्याचा चीनशी करार होता. पण चीनने त्या करारांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे साहजिकच, सीमेची स्थिती संबंधांची स्थिती निश्चित करेल, असे त्यांनी म्हटलं.