कीव - रशियाने युक्रेनविरोधात युद्ध ( Russia Ukraine Crisis ) पुकारले आहे. युक्रेनचे सैनिक जिगरीने लढत असून देश वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना कीव सोडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कीव सोडण्यासाठी विमान पाठवण्याची ऑफरही दिली आहे. पण वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचा ‘एक्झिट प्लान’ ( Volodymyr Zelenskyy declines US offer to evacuate Kyiv )नाकारला आहे. युद्ध सुरू असताना देश सोडून पळून जाण्यासाठी विमान नाही, तर मला शस्त्रे पुरवा, असे म्हणत वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी शेवटच्या श्वावासापर्यंत रशियन सैनिकांविरोधात निकारने लढत राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करत आप कीवध्येच राहणार असल्याचं स्पष्टपणे सांगतिले.
युक्रेनच्या संरक्षण विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून झेलेन्स्की यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. देशातील सर्व नागरिक, सैन्य येथे आहेत. आम्ही सर्वजण आमच्या देशाचे संरक्षण करत असून येथेच राहणार आहोत, असे त्यांनी म्हटलं. रशियन सैन्य कीवमध्ये घुसल्यानंतर झेलेन्स्की भूमीगत झाल्याचे वृत्त आले होते. पण, व्हिडिओ शेअर करत आपण सैन्यासोबत खुलेआम फिरत असून बैठका घेत असल्याने त्यांनी सांगितले. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते कीवमधील एका इमारतीसमोर उभे असल्याचे दिसून येते.
पुतीन यांच्या युद्धाच्या निर्णयाचा अमेरिकेने निषेध नोंदवला आहे. रशियाच्या या निर्णयावर अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी चांगलेच संतापलेले दिसत आहेत. अमेरिका आणि ब्रिटननेही रशिया आणि युक्रेन या दोन्ही प्रदेशांवर कडक निर्बंध लादण्यास सुरवात केली.