लंडन - बलुचिस्तानी नागरिकांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या तीन मानवी हक्क संघटनांनी एका परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद लंडन येथे ११ डिसेंबरला होणार आहे. या एकदिवसीय परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सध्या बलुचिस्तानची स्थिती बिकट होत चालली आहे. पाकिस्तानी सरकारकडून येथे मानवी हक्क उल्लंघनाच्या अनेक घटना घडत आहेत. बलुच नागरिकांवरील हल्ल्यांचे प्रकार मागच्या काही दिवसांपासून वाढले आहेत. काही ठिकाणी तर नरसंहाराच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. यामुळे बलुचिस्तानी नागरिकांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे.
हेही वाचा -पेट्रोल भाववाढीविरोधाच्या आंदोलनाचा भडका, इराणमध्ये पेट्रोलची तिप्पट दरवाढ