महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

ब्रिटनमध्ये कोविड रुग्णसंख्येत 24 तासांत नोंदवली सर्वाधिक वाढ

रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनचे अध्यक्ष अँड्र्यू गोडार्ड यांनी म्हणाले की, 'नवीन सापडलेला कोरोना विषाणू नक्कीच अधिक संसर्गजन्य आहे आणि तो देशभर पसरत आहे. आम्हाला आणखी रुग्ण सापडण्याची मोठी शक्यता आहे आणि त्यासाठी आपण तयार असले पाहिजे.'

ब्रिटन कोविड रुग्ण न्यूज
ब्रिटन कोविड रुग्ण न्यूज

By

Published : Jan 3, 2021, 8:03 PM IST

लंडन - ब्रिटनमध्ये कोविड-19 चे आणखी 57 हजार 725 रुग्ण आढळले आहेत. ही देशातील आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. शनिवारी हे अधिकृत आकडे जाहीर करण्यात आले.

सिन्हुआच्या अहवालानुसार देशात कोरोना विषाणूच्या एकूण रुग्णांची संख्या 25 लाख 99 हजार 789 वर पोहोचली आहे.

याच 24 तासांत कोरोना संसर्गामुळे 445 लोक मरण पावले आहेत. यासह ब्रिटनमधील कोरोना विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 74 हजार 570 वर पोहचली आहे.

नव्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर ब्रिटीश वैद्यकीय तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे की, नवीन विषाणूचा वेगवान प्रसार झाल्यामुळे भविष्यात आणखीही प्रकरणे समोर येऊ शकतात.

रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनचे अध्यक्ष अँड्र्यू गोडार्ड यांनी म्हणाले की, 'नवीन सापडलेला कोरोना विषाणू नक्कीच अधिक संसर्गजन्य आहे आणि तो देशभर पसरत आहे. आम्हाला आणखी रुग्ण सापडण्याची मोठी शक्यता आहे आणि त्यासाठी आपण तयार असले पाहिजे.'

ते म्हणाले, 'सध्या दक्षिण-पूर्व, लंडन आणि साउथ वेल्ससारख्या ठिकाणच्या इतर सर्व प्रकारच्या रुग्णालयांवर दबाव नाही. मात्र, येत्या काळात तो येऊ शकतो. त्यासाठी त्यांनी तयार रहावे,' असे ते म्हणाले.

हेही वाचा -यूकेमध्ये 24 तासांत 53 हजार 285 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 613 मृत्यूंची नोंद

विशेष म्हणजे लंडन आणि इंग्लंडच्या बर्‍याच भागांमध्ये, सर्वात कडक टायर 4 निर्बंध आधीपासूनच अस्तित्वात आहेत.

टायर 4 परिसरातील लोकांनाही असे आवाहन केले गेले आहे की, जर ते घरून काम करू शकतील तर त्यांनी घरून काम करावे. सपोर्ट बबल्स सोडून लोकांनी स्वतःच्या घराबाहेर कोणालाही भेटू नये.

आपात्कालीन परिस्थितीसाठी ब्रिटीश सरकारच्या वैज्ञानिक सल्लागार गटाने (एसएजी) इंग्लंडच्या सर्व भागांना टायर 4 बंदी घालण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा -कोविड - 19 चा नवीन प्रकार जर्मनीमध्ये नोव्हेंबरपासूनच आहे : अहवाल

ABOUT THE AUTHOR

...view details