महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Global Covid-19 Tracker : कोरोनाग्रस्तांची संख्या 17 लाखांच्या पुढे; मृतांचा आकडा एक लाख 8 हजारांवर - जगभरात कोरोना रुग्ण संख्या

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली असून अद्ययावत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 17 लाख 80 हजार 315 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत असून कोरोना विषाणूमुळे जागतिक आणिबाणी निर्माण झाली आहे.

Global COVID-19 tracker
Global COVID-19 tracker

By

Published : Apr 12, 2020, 10:49 AM IST

जिनेव्हा -कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली असून अद्ययावत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 17 लाख 80 हजार 315 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत असून कोरोना विषाणूमुळे जागतिक आणिबाणी निर्माण झाली आहे.

जगभरामध्ये कोरोना विषाणूची बाधा तब्बल 17 लाख 80 हजार 315 जणांना झाली आहे. तर कोरोनामुळे 1 लाख 8 हजार 828 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 4 लाख 4 हजार 31 जण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत.

कोरोनाग्रस्तांची संख्या 17 लाखांच्या पुढे; 1 लाख 8 हजार दगावले

अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 32 हजार 879 वर पोहचला आहे. तर 20 हजार 557 जणांचा मृत्यू झाला आहे. 28 हजार 200 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. स्पेनमध्ये 1 लाख 63 हजार 27 जण कोरोनाबाधित असून 16 हजार 606 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्ये 1 लाख 52 हजार 271 जण कोरोनाबाधित तर 19 हजार 468 जणांच्या मृत्यूची नोंद आहे.

वृद्ध व्यक्तींचा किंवा आधीच एखाद्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या नागरिकांचा सर्वात जास्त मृत्यू झाला आहे. वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी अनेक देशांनी संचारबंदी लागू केली असून नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनावर लस शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी अजून लस तयार होण्याच वेळ लागणार आहे. कोरोनाच्या फैलावामुळे जागतिक व्यापार, पर्यटन, वाहतूक, उद्योगधंदे सर्व ठप्प झाले आहेत. आरोग्याची जागतिक आणिबाणी निर्माण झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details