जिनेव्हा - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा 16 लाख 4 हजार 718 वर पोहचला आहे. तर, आतापर्यंत 95 हजार 735 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वच देशांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 3 लाख 56 हजार 660 रुग्ण पूर्णत: बरेदेखील झाले आहेत.
रोनाग्रस्तांची संख्या 16 लाखांच्या पुढे; 95 हजार दगावले न्युयॉर्कमध्ये मृत्यूचा आकडा वाढत चालला असून एका दिवसामध्ये 799 लोकांचा बळी गेला आहे. न्युयार्क राज्यात एकूण 7 हजार जण कोरोनामुळे मरण पावले आहेत. तर संपूर्ण अमेरिकेमध्ये 16 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
इटलीमध्ये 1 लाख 43हजार 626 कोरोनाबाधित आढळले असून 18 हजार 279 जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये 1 लाख 53 हजार 222 कोरोनाबाधित असून 15 हजार 447 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जर्मनीमध्ये 1 लाख 18 हजार 235 जण कोरोनाबाधित आहेत. तर 2 हजार 607 जणांचा मृत्यू झाला आहे. जपानच्या आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, देशात पहिल्यांदाच 500 हून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहे.
अनेक देशांमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोट्यवधी नागरिकांनी स्वत:ला घरांमध्ये कोंडून घेतले आहे. जागतिक व्यापार, पर्यटन, प्रवासी वाहतूक आणि उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.