जिनेव्हा - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा 15 लाख 18 हजार 719 वर पोहचला आहे. तर, आतापर्यंत 88 हजार 502 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वच देशांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 3 लाख 30 हजार 589 रुग्ण पूर्णत: बरेदेखील झाले आहेत.
अमेरिकेमध्ये कोरोनाबधित रुग्णांची संख्या 4 लाख 35 हजार 128, तर 14 हजार 795 जणांचा मृत्यू झाला आहे. ईटलीमध्ये 1 लाख 39 हजार 422 कोरोनाबाधित आढळले असून 17 हजार 669 जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये 1 लाख 48 हजार 220 कोरोनाबाधित असून 14 हजार 792 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाग्रस्तांची संख्या 15 लाखांच्या पुढे; 88 हजार दगावले जपानच्या आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, देशात बुधवारी पहिल्यांदाच 500 हून अधिक नवीन प्रकरणे समोर आली असून, एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4,768 वर पोहचली आहे.
तर भारतामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 540 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 5,734 झाली आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी 5,095 रुग्ण हे अॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत सुमारे 473 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तसेच, देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या 17 नव्या बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण बळींचा आकडा 166 वर पोहोचला आहे.