महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

नीरव मोदीचा जामीन वेस्टमिन्स्टर न्यायालयाने फेटाळला; भारताच्या प्रयत्नांना यश - london

नीरव मोदीला जामीन दिल्यास तो पळून जाण्याची शक्यता आहे. तसेच, तो पुरावे नष्ट करण्याची किंवा त्याच्या विरोधातील साक्षीदारांना लाच देण्याची किंवा धमकी देण्याचीही शक्यता आहे, असे भारताची बाजू मांडणाऱ्या टॉबी कॅडमन यांनी सांगितले.

नीरव मोदी

By

Published : Mar 29, 2019, 10:47 PM IST

लंडन - पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने फेटाळला आहे. भारतीय तपास यंत्रणांसाठी हे मोठे यश आहे. कारण, नीरव मोदीला जामीन मिळू नये यासाठी या तपास यंत्रणांनी न्यायालयात अत्यंत दमदारपणे आपली बाजू मांडली होती. २६ एप्रिलला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. तेव्हा नीरव मोदी न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधेल.

भारतीय प्राधिकरणाच्यावतीने बाजू मांडणाऱ्या टॉबी कॅडमन यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यांनी नीरव मोदीला जामीन दिल्यास तो पळून जाण्याची शक्यता आहे. तसेच, तो पुरावे नष्ट करण्याची किंवा त्याच्या विरोधातील साक्षीदारांना लाच देण्याची किंवा धमकी देण्याचीही शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. त्याला जामीन दिल्यास तो पळून जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

'नीरव मोदी भारतीय तपास तथकांना सहकार्य करीत नाही. तसेच त्याला जामीन द्यावा असे कोणतेही पुरेसे कारण नसल्याने त्याचा जामीन फेटाळण्यात यावा,' असा युक्तिवाद कॅडमन यांनी केला. तर, नीरवच्या वकील क्लेअर माँट्गोमेरी यांनी नीरव याला जामीनाचा अधिकार असल्याचे म्हटले. तो एक व्यावसायिक असून त्याचे अंडरवर्ल्ड किंवा गुन्हेगारी संबंध नाहीत, असे त्या म्हणाल्या.

मुख्य न्यायाधीश एम्मा अर्बथनॉट यांनी युक्तिवाद ऐकून घेतले आणि निर्णय दिला. अर्बथनॉट यांनीच गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विजय मल्ल्याच्या प्रत्यर्पणाचे आदेश दिले होते. नीरव मोदीच्या वकिलाने सुनावणीपूर्वी सांगितले की, ते प्रभावीपणे याचिका दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहेत. यापूर्वी जिल्हा न्यायाधीश मेरी मॅलोनच्या न्यायालयात पहिल्यांदा सुनावणीदरम्यान नीरव मोदीची याचिका फेटाळली होती.

न्यायालयात मेहुल चोक्सीचा भाऊ आणि अँटवर्प येथील डिमिन्को एनव्ही हिऱ्यांचा व्यापारी चेतन चोक्सी हाही उपस्थित होता.

ABOUT THE AUTHOR

...view details