पॅरिस -ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे झालेल्या गोळीबारानंतर आपला देश आणि फ्रेंच नागरिक ऑस्ट्रियाबरोबर त्यांच्या शोकात सहभागी आहेत, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. 'आमच्या शत्रूंना ते कोणाबरोबर वाकड्यात पडत आहेत, हे माहीत असले पाहिजे. आम्ही झुकणार नाही,' असे ते पुढे म्हणाले.
'फ्रान्सनंतर आमच्या एका मित्र देशावर हल्ला झाला आहे. हा आमचा युरोप आहे. आपल्या शत्रूंना ते कोणाशी लढा देत आहेत हे माहीत असले पाहिजे. आम्ही झुकणार नाही,' असे ट्विट मॅक्रॉन यांनी केल्याचे वृत्त वृत्तसंस्था सिन्हुआने दिले आहे.
हेही वाचा -दहशतवादाला तोंड देण्यासाठी नवी रणनीती आखणार; फ्रान्सच्या पंतप्रधानांनी घेतली शपथ