महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

गांधी @१५० : फ्रान्स, उझबेकिस्तानसह टर्की, पॅलेस्टाईन देशांनी छापले गांधीजींचे पोस्टाचे तिकीट

गांधीजींच्या १५० व्या जंयती निमित्ताने फ्रान्ससह उझबेकिस्तान, टर्की, पॅलेस्टाईनने गांधीजींचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले आहे.

गांधी

By

Published : Oct 3, 2019, 8:32 AM IST

पॅरिस- जगाला सत्य, अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींची १५० वी जयंती जगभरामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. विविध कार्यक्रमांमधून गांधीजींना श्रद्धांजली वाहण्यात आली. गांधीजींच्या १५० व्या जंयती निमित्ताने फ्रान्ससह उझबेकिस्तान, टर्की, पॅलेस्टाईनने गांधीजींचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले आहे. जगभरामध्ये गांधीजींचा आदर केला जातो. याचा प्रत्यय त्यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने आला.

हेही वाचा - गांधी १५० : सेवाग्राममधील गांधींची दहा वर्षे..

फ्रान्स सरकाराने गांधी जयंती निमित्त पोस्टाचे तिकीट प्रदर्शित केल्याचे फ्रान्समधील भारतीय दुतावासाने ट्विट केले आहे. 'लापोस्ट' या फ्रान्सच्या पोस्ट खात्याने गांधी जयंती निमित्त पोस्टाचे तिकीट प्रदर्शित केले आहे. या अनावरणासाठी भारतीय दुतावासाने 'लापोस्ट' बरोबर सहकार्य केले, असे ट्विट फ्रान्समधील भारतीय दुतावासाने केले.

हेही वाचा - गांधी@१५० : ईटीव्ही भारतचे विशेष गीत; पंतप्रधानांसह इतर मान्यवरांकडून कौतुक

गांधी जयंतीनिमित्त नेपाळमधील भारतीय दुतावासामध्ये गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच अनेक देशातील भारतीय दुतावास कार्यालयांनी गांधी जयंतीनिमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details