महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

फ्रान्स सरकारचा मसूद अजहरची मालमत्ता गोठवण्याचा निर्णय - pakistan

'दहशतवादाविरोधात लढण्यासाठी फ्रान्सने नेहमीच भारताची बाजू घेतली आहे आणि पुढेही भारताच्या बाजूलाच राहील,' असे निवेदन फ्रान्स सरकारकडून जारी करण्यात आले आहे. तसेच, इतर युरोपीय मित्र देशांसमोरही हा मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन दिले आहे.

इमॅन्युएल मॅक्रॉन, मसूद अजहर

By

Published : Mar 15, 2019, 5:30 PM IST

पॅरिस - फ्रान्स सरकारने आज (शुक्रवार) जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरची मालमत्ता गोठवण्याचा निर्णय घेतला. देशात हा निर्णय लागू करण्यात आला आहे. तसेच, युरोपीयन सहकाऱ्यांसमोरही हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे इमॅन्युएल मॅक्रॉन सरकारने म्हटले आहे. युरोपमधील देशांकडेही मसूदला दहशतवादी कारवायांशी संबंधित व्यक्तींच्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

'दहशतवादाविरोधात लढण्यासाठी फ्रान्सने नेहमीच भारताची बाजू घेतली आहे आणि पुढेही भारताच्या बाजूलाच राहील,' असे निवेदन फ्रान्स सरकारकडून जारी करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात चीनने खोडा घातला. यानंतर ३ दिवसांतच फ्रान्सने हे पाऊल उचलले आहे. फ्रान्सने सुरक्षा परिषदेत यासाठी प्रस्ताव मांडला होता. त्याला इतर अनेक देशांनी पाठिंबाही दिला होता. मात्र, चीनने मागील १० वर्षांपासून 'व्हिटो' अधिकाराचा वापर करत पाकिस्तानला आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाठिशी घालण्याचा विडा उचलला आहे.

काश्मीरमधील पुलवामा येथे भारतीय सीआरपीएफ जवानांवर आत्मघातकी हल्ला झाला होता. याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. यानंतर फ्रान्सने भारताच्या बाजूने उभे राहात जैशचा म्होरक्या मसूद अजहरला आंतराराष्ट्रीय दहशतवादी ठरविण्यासाठी सुरक्षा परिषेदत ठराव मांडला होता. आता फ्रान्सने राष्ट्रीय पातळीवर मसूदची मालमत्ता गोठवण्यास मंजूरी दिली आहे. तसेच, इतर युरोपीय मित्र देशांसमोरही हा मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details