महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

ओसामा बिन लादेनच्या माजी प्रवक्त्याने केली ब्रिटनमध्ये परतण्याची तयारी - 1998 केनिया टांझानियातील अमेरिकन दूतावासांवर हल्ला

ओसामा बिन लादेनचा माजी सहकारी असलेल्या 60 वर्षीय अ‍ॅडेल अब्देल बॅरी याला 1998 साली केनिया आणि टांझानिया येथील अमेरिकन दूतावासांवर करण्यात आलेल्या विनाशकारी हल्ल्यांच्या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले होते. या हल्ल्यांमध्ये 224 लोक ठार आणि तब्बल 5 हजार जण जखमी झाले होते.

ओसामा बिन लादेन न्यूज
ओसामा बिन लादेन न्यूज

By

Published : Oct 14, 2020, 8:03 AM IST

लंडन -अल कायदा या दहशतवादी संघटनेचा माजी नेता ओसामा बिन लादेनचा लंडनमधील सहाय्यक आणि प्रवक्ता अ‍ॅडेल अब्देल बॅरीची अमेरिकेच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर आता तो ब्रिटनला परत येणार आहे.

ओसामा बिन लादेनचा माजी सहकारी असलेल्या 60 वर्षीय अ‍ॅडेल अब्देल बॅरी याला 1998 साली केनिया आणि टांझानिया येथील अमेरिकन दूतावासांवर करण्यात आलेल्या विनाशकारी हल्ल्यांच्या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले होते. या हल्ल्यांमध्ये 224 लोक ठार आणि तब्बल 5 हजार जण जखमी झाले होते.

दि सनच्या वृत्तानुसार, या हल्ल्यांच्या पुढच्या वर्षी दहशतवादी बॅरीला अटक करण्यात आली होती. त्याचे अमेरिकेला प्रत्यर्पण करण्यात आले होते. परदेशात अमेरिकन नागरिकांच्या हत्येचा कट रचण्यासह एकूण तीन आरोप त्याने कबूल केले होते. या वेळी करण्यात आलेल्या याचिकेतील करारास मान्यता दिल्यानंतर 2015 मध्ये बॅरीला 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु, नंतर या शिक्षेतील 16 वर्षे त्याने आधीच तुरुंगात घालवली असल्याची बाब विचारात घेण्यात आली.

बॅरीचा जन्म इजिप्तमध्ये झाला होता. परंतु, 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला त्याला ब्रिटनमध्ये आश्रय मिळाला होता. बॅरी हा अमेरिकेतील 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि अल कायदाचा माजी नेता असलेल्या ओसामा बिन लादेनचा लंडनमधील सहकारी आणि प्रवक्ता होता.

त्यासाठी त्याने मीडिया इन्फॉर्मेशन ऑफिस नावाच्या सेलचे नेतृत्व केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details