कोरोना विषाणु महामारीमध्ये इंग्लंडमध्ये अडकलेल्या भारतीयांसह परदेशी नागरिकांना मोठा दिलासा देत, ज्यांच्यावर परिणाम झाला आहे त्यांच्या व्हिसाच्या मुदतीत १५ मेपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडमध्ये असलेल्या सर्व परदेशी नागरिकांना आणि २४ जानेवारीनंतर ज्याच्या व्हिसाची मुदत संपली आहे असे नागरिक आता आपल्या गृह कार्यालयात इमेल करून यावर्षीच्या ३१ मेपर्यंत मुदतवाढ प्राप्त करून घेऊ शकतील. जागतिक लॉकडाऊन आणि प्रवासाच्या निर्बंधांमुळे जे परदेशी अडकलेल्या नागरिकांसाठी हा स्वागतार्ह निर्णय आहे. ज्या व्यक्ति इंग्लंडमध्ये आहेत आणि या वर्गात चपखल बसतात त्यांना CIH@homeoffice.gov.uk या मेलवर इमेल पाठवण्यास सांगितले आहे आणि त्यांच्या विस्तारित मुक्कामाच्या कारणाची रूपरेषा, त्यांचे नाव आणि मागील व्हिसाचा संदर्भ क्रमांक ही माहिती द्यावी लागेल. विनामूल्य हेल्पलाईन क्रमांक ०८००६७८१७६७ हा कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यरत असेल.
इंग्लंड लोकांचे आरोग्य आणि उत्तम स्थिती याला प्रथम स्थानी ठेवत आले आहे आणि कुणालाही त्यांच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या परिस्थितीबद्दल शिक्षा केली जाणार नाही. लोकांच्या व्हिसाची मुदतवाढ करून, लोकांना आम्ही मनाची शांतता प्रदान करत आहोत आणि जे अत्यंत महत्वाच्या सेवेत आहेत तेही आपले काम सुरू ठेवतील, याची सुनिश्चिती करत आहोत, असे ब्रिटिश गृहमंत्री प्रिती पटेल यांनी सांगितले. अधिकार्यांनी असेही आश्वासन दिले आहे की आवश्यकता पडल्यास या मुदतवाढीचा पुढील विस्तारासाठी फेरआढावाही घेतला जाईल. देशांतर्गत स्विचिंग तरतूदही तात्पुरती वाढवली जात आहे. यामुळे युकेमध्ये राहणाऱ्या लोकांना आपले मार्ग स्तर ४ (विद्यार्थी) वरून स्तर २ (साधारण कामगार) असे बदलता येतील. अशा प्रकारे त्यांना त्यांना काम करण्याची गरज असेल तर तेथेच राहता येईल.
भारतातील हंगामी उच्चायुक्त जॉन थॉम्पसन यांनी युकेमध्ये अडकलेल्या अनेक भारतीयांना दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली. घरी परतू न शकणार्या प्रवाशांना सध्याची स्थिती किती दुःखदायक आहे, याची मला तीव्रतेने जाणीव आहे. या घोषणेमुळे युकेमध्ये असलेल्या अनेक भारतीय नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा आहे. स्वतंत्रपणे, भारतात, माझे कर्मचारी आणि मी भारतातील ब्रिटिश नागरिकांना मदत हवी असेल तर त्यांना ती मिळेल, यासाठी चोविस तास काम करत आहोत, असेही थॉम्पसन म्हणाले. दरम्यान, भारतानेही प्रतिसाद देत देशातील सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी व्हिसाचा कालावधी जाहिर केला आहे. १५ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत भारताने व्हिसाची मुदत वाढवली आहे. व्हिसाची मुदतवाढ मिळवण्यासाठी परदेशी नागरिकांना परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयात एक अर्ज ऑनलाईन सादर करण्यास सांगितले आहे. १७ मार्चपासून भारताने ३७ देशांच्या नागरिकांना भारतात येण्यास बंदी घातली असून २२ मार्चपासून सर्व व्यावसायिक विमान कार्यचालन थांबवले आहे.
परदेशी दूतावासांची नागरिकांना स्वदेशी परतण्यासाठी मदत..