ओस्लो - नॉर्वे देशात दरड कोसळल्याची भीषण घटना घडली. दरडीच्या मलब्याखाली अनेक घरे दबली गेली असून बचाव पथकाकडून मदत आणि शोधकार्य सुरू आहे. राजधानी नॉर्वे शहराच्या जवळच ही घटना घडली. गुरुवारी दरड कोसळल्याची घटना घडली होती. आत्तापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
नॉर्वे : दरड कोसळून पाच जणांचा मलब्याखाली दबून मृत्यू - नॉर्वेत दरड कोसळली
नॉर्वे देशात दरड कोसळल्याची भीषण घटना घडली. दरडीच्या मलब्याखाली अनेक घरे दबली गेली असून बचावपथकाकडून मदत आणि शोधकार्य सुरू आहे.
नॉर्वेत दरड कोसळली
आणखी पाच व्यक्ती बेपत्ता -
आणखी पाच व्यक्ती बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. आज सकाळी सहा वाजता पाचवा मृतदेह बाहेर काढला. दरड कोसळल्यानंतर दहाजण बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दहा जणांचा शोध घेण्यात येत होता. त्यातील पाच व्यक्तींचे मृतदेह आत्तापर्यंत सापडले आहेत. तर पाच व्यक्ती बेपत्ता आहेत. हा प्रदेश बर्फाळ असून शोधकार्यात अडथळे येत आहेत.