लंडन - युरोपीय औषधी एजन्सीने 12 ते 17 वर्षाच्या मुलांना मॉडर्ना कंपनीची लस देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. 18 वर्षाखालील मुलांना लस देण्यासाठी पहिल्यांदाच मंजुरी मिळाली आहे.
शुक्रवारी यूरोपीय संघाच्या औषधी एजन्सीने म्हटले की, 12 ते 17 वयाच्या 3,700 हून अधिक मुलांवर करण्यात आलेल्या संशोधनात मॉडर्ना लसीकरणानंतर त्यांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्याचे समोर आले आहे.
यूरोपमध्ये 18 वर्षांच्या वरील लोकांना मॉडर्ना लसीची यापूर्वीच परवानगी मिळाली आहे.
उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये आतापर्यंत 12 वर्षाच्या मुलांसाठी आतापर्यंत फायजर व त्यांची जर्मन भागीदार कंपनी बायोएनटेकची लस एकमेव पर्याय राहिला आहे.
मॉडर्ना कंपनीचे म्हणणे आहे, की लसीचे दोन डोस प्रौढ व्यक्तींप्रमाणे किशोरवयीम मुलांवरही प्रभावी आहे. अंगदुखी, डोकेदुखी, अशक्तपणा असे प्रौढांना येणाऱ्या रिअॅक्शन्स किशोरवयीन मुलांनाही येतात.