महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

युरोपात 5 लाखांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त, स्पेनमध्ये मृतांचा आकडा 10 हजारांच्या पुढे - covid in Europe

आत्तापर्यंत युरोपीय देशांमध्ये कोरोनाचे 5 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. स्पेनमध्ये 10 हजार तर इटलीमध्ये 13 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना
कोरोना

By

Published : Apr 3, 2020, 4:27 PM IST

हैदराबाद - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. चीनमध्ये सर्वात आधी हाहाकार माजवणाऱ्या कोरोना उद्रेकाचे दुसरे केंद्र म्हणजे युरोप. आत्तापर्यंत युरोपीय देशांमध्ये कोरोनाचे 5 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. स्पेनमध्ये 10 हजार तर इटलीमध्ये 13 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

याबरोबरच युरोपातील फ्रान्स, जर्मनी, इंग्लड, स्वित्झर्लंड या देशांनाही मोठा फटका बसला आहे. इतर खंडापेक्षा सर्वात जास्त रुग्ण युरोपात आढळले आहेत. इटली आणि स्पेनदेशांमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

युरोपात कोरोनाच्या प्रसाराची स्थिती

स्पेन - 1 लाख 17 हजार रुग्ण तर 10 हजार 935 मृत्यू

इटली - 1 लाख 15 हजार रुग्ण तर 13 हजार 915 मृत्यू

जर्मनी - 85 हजार रुग्ण, तर 1 हजरा 111 मृत्यू

फ्रान्स- 59 हजार रुग्ण तर 5 हजार 387 मृत्यू

स्वित्झर्लंड - 19 हजार रुग्ण तर 500 पेक्षा जास्त मृत्यू

बेल्जियम - 16 हजार रुग्ण 1 हजार 143 मृत्यू

नेदरलँड - 14 हजार रुग्ण 1 हजार 339 मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details