ब्रुसेल्स (बेल्जियम) -युरोपीयन युनियनने चीनवर प्रथमच जागतिक स्तरावर चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप लावला आहे. चीनने कोरोना विषाणुबद्दल खोटी तथ्य जगासमोर मांडण्यासाठी योजना आखल्याचा आरोपदेखील लावण्यात आला आहे. द गार्डीयनने याबाबत वृत्त प्रकाशित केले आहे.
या आरोपाशी संबंधित काही घटनांचा हवाला द गार्डीयनने दिला आहे. एप्रिल महिन्यात जेव्हा युरोपमध्ये कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढले होते, त्यावेळी तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या उपचार करण्यास नकार देत रुग्णांना मरण्यासाठी सोडून दिले होते, असा दावा चिनी दूतावासाच्या एका संकेतस्थळावर करण्यात आला होता. चीनी संकेतस्थळाच्या दाव्यानंतर फ्रेंच राजकारणी खूप संतापले होते.