चंदीगड ( पंजाब ) - युक्रेनमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यात कर्नाटकमधील ( Indian Student Died In Ukraine ) एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने युक्रेनमध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या मित्राशी बातचीत ( Naveen Friend Talk To ETV Bharat ) करून तेथील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. लवकेश ( Lovekesh In Ukraine ) असे या मुलाचे नाव असून तो पंजाबमधील भटिंडा ( Panjabi Student In Ukraine ) येथील मौर मंडीचा रहिवासी आहे. तो युक्रेनमध्ये शिकण्यासाठी गेला आहे. यावेळी बोलताना त्याने युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे म्हटले.
काय म्हणाला लवकेश -
युक्रेनमध्ये राहणारा नवीनचा मित्र लवकेश याच्याशी 'ईटीव्ही भारत'ने खास बातचीत केली आहे. ज्यामध्ये त्याने सांगितले की, या भागात राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. लवकेशने सांगितले की, आठवड्यापासून त्यांनी काहीही जेवलेले नाही. तसेच लवकेशने त्याचा वर्गमित्र नवीनचा मृत्यू कसा झाला हे देखील सांगितले. आपण लवकरच शहर सोडणार असल्याचे त्याने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. तसेच आम्हाला लवकरात लवकर परत आणण्याची मागणी त्याने भारत सरकारकडे केली आहे.