बर्लिन -अफगाणिस्तानच्या लोकांना मदत करण्यास वचनबद्ध असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या दोन्ही संस्थांनी एका निवेदनात म्हटले आहे.कोणत्याही व्यावसायिक उड्डाणाला काबूलमध्ये उतरण्याची परवानगी दिली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
अफगाणिस्तानातील लोकांना गरज असलेल्या गोष्टीचा पुरवठा करण्यासाठी कोणताही मार्ग मिळत नाहीये. इतर मानवतावादी संस्थांनाही अशाच समस्या भेडसावत आहेत, असे संयुक्त राष्ट्राने सांगितले.
अनेक नागरिकांना बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. परंतु बहुसंख्य लोकसंख्येला मानवतावादी मदतीची गरज आहे. ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, असे संयुक्त राष्ट्राने म्हटलं. अफगाणिस्तानातील लोकांना औषधे आणि इतर मदतीचे अखंडित वितरण सुनिश्चित करण्यासाठी त्वरित "मानवतेचा सेतू " उभारण्याची मागणी जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने केली आहे.
अहवालांनुसार, सध्याच्या स्थितीत सुमारे 6 लाख लोकांना अफगाणिस्तानमध्ये आपली घरे सोडावी लागली आहेत. यापैकी 80 टक्के महिला आणि मुले आहेत. त्यांना निवारा गृह, अन्न, स्वच्छता, औषधांची नितांत गरज आहे.