महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

कोरोनाचा कहर! केवळ युरोपमध्ये 46 हजार नागरिकांचा मृत्यू... - युरोपात कोरोनाचा कहर

चीनमध्ये सर्वात आधी हाहाकार माजवणाऱ्या कोरोना उद्रेकाचे दुसरे केंद्र युरोप झाला आहे. कोरोनामुळे 85 टक्के मृत्यू हे ईटली, स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये झाले आहेत.

कोरोनाचा कहर
कोरोनाचा कहर

By

Published : Apr 5, 2020, 11:42 AM IST

हैदराबाद - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. चीनमध्ये सर्वात आधी हाहाकार माजवणाऱ्या कोरोना उद्रेकाचे दुसरे केंद्र युरोप झाला आहे. जगभरात कोरोनामुळे 85 टक्के मृत्यू हे ईटली, स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये झाले आहेत.

आत्तापर्यंत युरोपातील कोरोनाबाधित 6 लाख 27 हजार 203 प्रकरणांपैकी एकूण 46 हजार 33 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये 11 हजार 744 तर इटलीमध्ये 15 हजार 362 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये 7 हजार 560 आणि 4 हजार 313 जण दगावले आहेत. इतर खंडापेक्षा सर्वात जास्त रुग्ण युरोपात आढळले आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये जगभरात कोरोनाच्या तब्बल एक लाख रुग्णांची नोंद झाली, तर सुमारे साडेपाच हजार रुग्णांचा यात बळी गेला आहे. जगभरात सध्या कोरोनाचे 12 लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत, तर सुमारे 65 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जगभरातील कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत (3,11,357) आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ स्पेन (1,26,168), इटली (1,24,632), जर्मनी (96,092), आणि फ्रान्सचा (89,953) क्रमांक लागतो. तर, जगात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये (15,362) झाले आहेत. त्यापाठोपाठ स्पेन (11,947), अमेरिका (8,452), फ्रान्स (7,560) आणि इंग्लंडचा (4,313) क्रमांक लागतो

ABOUT THE AUTHOR

...view details