जिनिव्हा -सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे जगभरातील संपूर्ण जनजीवन विसकळीत झाले आहे. कोरोना विषाणूवर अटकाव आणण्यासाठी जगभारात प्रयत्न सुरु आहेत. कदाचित कोरोना विषाणू कधीच पूर्णपणे जाणार नाही, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे आपल्याला त्यासोबतच जगण्याची कला आत्मसात करायला हवी, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
'कदाचित कोरोना विषाणू कधीच पूर्णपणे जाणार नाही'
कोरोना विषाणूचे संक्रमण फार झपाट्याने होते. तसेच यावर लसही नसल्याने आपण त्यावर कधी पूर्णपणे मात करू हे सांगता येत नाही. कदाचित कोरोना विषाणू कधीच पूर्णपणे जाणार नाही. त्यामुळे जगभरातील लोकांना कोरोना विषाणूबरोबरच जगण्याची कला शिकावी लागेल, असे डब्ल्यूएचओचे आपत्कालीन संचालक मायकेल रायन म्हणाले.
कोरोना विषाणूचे संक्रमण फार झपाट्याने होते. तसेच यावर लसही नसल्याने आपण त्यावर कधी पूर्णपणे मात करू हे सांगता येत नाही. कदाचित कोरोना विषाणू कधीच पूर्णपणे जाणार नाही. त्यामुळे जगभरातील लोकांना कोरोना विषाणूबरोबरच जगण्याची कला शिकावी लागेल, असे डब्ल्यूएचओचे आपात्कालीन संचालक मायकेल रायन म्हणाले.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरतील बऱ्याच देशांनी लॉकडाऊन लागू केले होते. अर्थव्यवस्था ढासळत असल्याने आता हळूहळू लॉकडाउनवरील निर्बंध कमी करण्यात येत आहेत. चीनमध्ये डिसेंबरच्या शेवटी कोरोनाचा उद्रेक झाला होता. आतापर्यंत लाखोंच्या संख्येने कोरोनाने बळी घेतले आहेत.