रोम - कोरोना विषाणूचा प्रसार जगातील 180 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसार झाला आहे. युरोपीत इटली आणि स्पेनमध्ये कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. दोन्ही देशांमध्ये आत्तापर्यंत 14 हजार 824 जणांचा मृत्यू झाला आहे. काल(शुक्रवारी) दिवसभरात 1692 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीत 919 तर स्पेनमध्ये 773 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज सकाळपासून स्पेनमध्ये 500 पेक्षा जास्त रुग्ण दगावले आहेत.
कोरोना: इटली, स्पेनमध्ये चीनपेक्षाही गंभीर स्थिती, 14 हजार 824 रुग्ण दगावले
इटलीमध्ये आत्तापर्यंत 86 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून 9 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये 65 हजार पेक्षा जास्त नागरिकांना लागण झाली असून 5 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
इटलीमध्ये आत्तापर्यंत 86 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून 9 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये 65 हजार पेक्षा जास्त नागरिकांना लागण झाली असून 5 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चीननंतर युरोप हे कोरोना विषाणूप्रसाराचे नवे केंद्र झाले आहे. जर्मनी 50 हजार, फ्रान्स 32 हजार, इग्लंड 14 हजार, स्वित्झर्लंड 12 हजार, नेदरलँडमध्ये 8 हजार नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.
जगभरातील इतरही खंडामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. आत्तापर्यंत सुमारे सहा लाख नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर 27 हजार पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलास देणारी बातमी म्हणजे 1 लाख 34 हजारपेक्षा जास्त नागरिक पूर्णपणे बरेही झाले आहेत. करोनाचा प्रसार होऊ नये म्हणून अनेक देशांनी शहरेच्या शहरे बंद ठेवली असून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि प्रवास ठप्प झाला आहे.