वॉशिंग्टन डी. सी- जगभरातील 200 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा 11 लाख 38 हजार 646 वर पोहचला असून 61 हजार 142 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बातमी म्हणजे 2 लाख 36 हजार 185 जण पूर्णत: बरे झाले आहेत.
जगभरातील एकूण रुग्णांपैकी 8 लाख जण कोरोना अॅक्टीव(सक्रिय) आहेत. अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा अडीच लाखांच्या पुढे गेला आहे. तर युरोपीय देशांमध्ये 5 लाखांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला असून शहरेच्या शहरे बंद ठेवण्यात आली आहेत. अमेरिकेत काल(शुक्रवार) दिवसभरात 1 हजार 300 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांना मृत्यू झाला आहे.
काय आहे जगातील परिस्थिती ?
अमेरिकेत 2 लाख 77 हजार रुग्ण तर मृत्यू 7 हजार 406