महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

China on Ukraine Russia war : रशिया-युक्रेनमधील युद्धाच्या बाजूने चीन नाही- चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून स्पष्ट भूमिका जाहीर

युक्रेनमधील संकटाच्या पहिल्या दिवसापासून शांततेची भूमिका असल्याचेही चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले ( China on Ukraine Russia war ) आहे. काही शक्ती चीनच्या उद्दिष्टाबाबत जाणीवपूर्वक संशय निर्माण करत आहेत. तसेच चुकीची माहिती निर्माण करत ( Misinformation about china ) असल्याचाही त्यांनी दावा केला. रशियाने युक्रेनवर हल्ला केला असताना चीनने रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थाची भूमिका पार पाडावी, असा काही देशांचा आग्रह आहे.

चीनचे परराष्ट्र मंत्री वाँग यी
चीनचे परराष्ट्र मंत्री वाँग यी

By

Published : Mar 15, 2022, 3:31 PM IST

बीजिंग - चीन हा रशिया-युक्रेन युद्धाच्या पक्षात ( Russia Ukraine war ) नाही, अशी चीनची स्पष्ट भूमिका असल्याचे चीनचे परराष्ट्र मंत्री वाँग यी ( chinas foreign minister Wang Y ) यांनी सांगितले. रशियाने सैन्यदलाच्या शस्त्रात्रे उपकरणांसाठी चीनकडे मदत मागितल्याचा दावा केला जात आहे. त्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

युक्रेनमधील संकटाच्या पहिल्या दिवसापासून शांततेची भूमिका असल्याचेही चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले ( China on Ukraine Russia war ) आहे. काही शक्ती चीनच्या उद्दिष्टाबाबत जाणीवपूर्वक संशय निर्माण करत आहेत. तसेच चुकीची माहिती निर्माण करत ( Misinformation about china ) असल्याचाही त्यांनी दावा केला. रशियाने युक्रेनवर हल्ला केला असताना चीनने रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थाची भूमिका पार पाडावी, असा काही देशांचा आग्रह आहे. दुसरीकडे तज्ज्ञांच्या मते रशियाशी संबंध अधिक दृढ करण्याची चीनला संधी आहे.

हेही वाचा-New Covid Wave In China : चीनमध्ये कोरोनाची नवी लाट.. अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन

युद्धाचा 19 वा दिवस

युक्रेन रशिया युद्धाचा आजचा 19 वा दिवस आहे. (Russia Ukraine war) दरम्यान, आज पुन्हा एकदा युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये आज सोमवार दि. (14 मार्च)रोजी 10 :30 वाजता बोलणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अगोदर युक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की यांनी एक व्हिडीओच्या माध्यमातून मत मांडले आहे. त्यामध्ये त्यांनी रसिया नाटोवरही हल्ला करू शकतो असा इशारा दिला आहे.

हेही वाचा-Murder Of Journalist : पुरस्कार विजेते व्हिडिओ पत्रकार ब्रेंट रेनॉड यांची युक्रेनमध्ये हत्या

तर रशियन क्षेपणास्त्रे नाटोच्या हद्दीत

झेलेन्स्की म्हणाले, "मी चेतावणी दिली की प्रतिबंधक निर्बंधांशिवाय रशिया युद्ध सुरू करेल आणि मॉस्को नॉर्ड स्ट्रीम 2 एक शस्त्र म्हणून वापरेल. (American president Joe Biden)" युक्रेनचे अध्यक्ष म्हणाले, "मी पुन्हा सांगतो की जर तुम्ही आमचे आकाश बंद केले नाही (फ्लाय झोन), तर रशियन क्षेपणास्त्रे नाटोच्या हद्दीत आदळण्यास वेळ लाणार नाही. असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा-Ukraine-Russia war : युक्रेन- रशिया युध्दात 596 जणांचा मृत्यू; आज दोन्ही देशांमध्ये पुन्हा चर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details