ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांची ब्रेक्झिट कायद्यास औपचारिक मंजुरी - ब्रेक्झिट सेक्रेटरी स्टीव्ह बर्कले

ब्रिटनच्या संसदेने  ब्रेक्झिट  विधेयकास मान्यता दिल्यानंतर ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी ब्रेक्झिट या महत्त्वपूर्ण कायद्यास औपचारिक मंजूरू दिली

ब्रिटनची राणी एलिझाबेथ
ब्रिटनची राणी एलिझाबेथ
author img

By

Published : Jan 23, 2020, 10:41 PM IST

लंडन -ब्रेक्झिट प्रकरण दिवसागणिक नवीन वळणं घेत आहे. ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी ब्रेक्झिट या महत्त्वपूर्ण कायद्यास औपचारिक मान्यता दिली आहे. ब्रेक्झिट सेक्रेटरी स्टीव्ह बर्कले यांनी टि्वट करून ही माहिती दिली आहे.

ब्रिटनच्या संसदेने ब्रेक्झिट विधेयकास मान्यता दिल्यानंतर ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी ब्रेक्झिट या महत्त्वपूर्ण कायद्यास औपचारिक मंजूरू दिली. त्यानुसार 31 जानेवारीला ब्रिटन हा युरोपीय महासंघातून बाहेर पडणार असल्याचे निश्चित झाले आहे.
युरोपीय महासंघात ब्रिटनचा प्रवेश उशिराने झाला आणि त्यातून प्रथम बाहेर पडणारे तेच राष्ट्र ठरणार आहे. माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरूनच्या कारकीर्दीत ब्रेक्झिट सार्वमत घेण्यात आले होते. मात्र, ब्रेक्झिटला पाठिंबा देणारे जनमत रोखण्यात त्यांना अपयश आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details