लंडन - ब्रिटनमध्ये चक्रीवादळ बेलामुळे पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेकडो लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे.
शनिवारी ब्रिटनमधील चक्रीवादळ बेलामुळे जोरदार वारे आणि पुराचे अनेकदा सतर्कतेचे इशारे देण्यात आले आहेत, अशी माहिती वृत्तसंस्था सिन्हुआने मेट ऑफिसच्या हवाल्याने दिली आहे. या वादळाचा परिणाम इंग्लंड, वेल्स, उत्तर आयर्लंड आणि दक्षिण स्कॉटलंडच्या काही भागांवर तसेच किनारपट्टीवरील भागात सर्वाधिक होण्याची शक्यता आहे.
पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, ख्रिसमसच्या दिवशी इंग्लंडच्या बेडफोर्डशायरमधील रिव्हर ग्रेट ऑउसजवळील 1 हजार 300 पेक्षा जास्त घरे रिकामी करण्याचा सल्ला देण्यात आला. बेडफर्डशायर फायर सर्व्हिसने सांगितले की, पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी घरातून बाहेर काढलेल्या लोकांसाठी स्थानिक केंद्रे बांधली गेली आहेत. पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे परिस्थिती फारच कठीण झाली आहे.
हेही वाचा -ख्रिसमसच्या दिवशी वीज गायब! अमेरिकेत लाखाहून अधिक लोक प्रभावित