लंडन- इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी दिवाळीच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ब्रिटीश हिंदू, शीख आणि जैन यांच्याबद्दल आदरही व्यक्त केला आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी इतरांना मदत केल्याचे पंतप्रधान जॉन्सन यांनी व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.
इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ट्विट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये त्यांनी कोरोना महामारीवर विजय मिळवू, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. यंदाच्या दिवाळीवर कोरोनाची पडछाया असेल, याविषयीही जॉन्सन यांनी मत व्यक्त केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे त्यांनी आवाहन केले.