महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

नोबेल २०१९ : जॉन बी. गुडइनफ एम. स्टॅनली व्हिटिंगहम अन् अकिरो योशिनो ठरले रसायनशास्त्रातील नोबेलचे पारितोषिक विजेते!

रसायनशास्त्र विषयातील यावर्षीचे नोबेल पारितोषिक जॉन बी. गुडइनफ एम. स्टॅनली व्हिटिंगहम अन् अकिरो योशिनो यांना संयुक्तपणे देण्यात आले. लिथियम-आयन बॅटरींच्या विकासासाठी त्यांना यावर्षीचे नोबेल देण्यात आले. सात ऑक्टोबरपासून यावर्षीच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा होते आहे. सात ऑक्टोबरला शरीरविज्ञान/वैदकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता, तर काल भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.

2019 Nobel Prize in Chemistry

By

Published : Oct 9, 2019, 3:21 PM IST

स्टॉकहोम - रसायनशास्त्र विषयातील यावर्षीचे नोबेल पारितोषिक जॉन बी. गुडइनफ एम. स्टॅनली व्हिटिंगहम अन् अकिरो योशिनो यांना संयुक्तपणे देण्यात आले. लिथियम-आयन बॅटरींच्या विकासासाठी त्यांना यावर्षीचे नोबेल देण्यात आले. सात ऑक्टोबरपासून यावर्षीच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा होते आहे. सात ऑक्टोबरला शरीरविज्ञान/वैदकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता, तर काल भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.

नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनांसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक 'अल्फ्रेड नोबेल'ने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले होते.यावर्षीचा साहित्य विषयातील नोबेल पुरस्कार उद्या (दहा ऑक्टोबर) रोजी जाहीर होणार आहे. यावर्षी २०१८ आणि २०१९ या दोन्ही वर्षांचे पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. मागील वर्षी झालेल्या घोटाळ्यामुळे पुरस्कारासाठी कोणाचेही नाव निवडले गेले नव्हते.

ABOUT THE AUTHOR

...view details