लंडन -प्रसिद्ध ब्रिटिश चित्रकार बँक्सी यांनी ब्रिटिश संसदेत चिंपांझी असलेले छायाचित्र काढले होते. या छायाचित्राला तब्बल १० दशलक्ष पाऊंड अशी विक्रमी किंमत मिळाली आहे. बँक्सी यांच्या दुसऱ्या कोणत्याही कलाकृतीला एवढी किंमत मिळाली नव्हती.
एक दशलक्ष पाऊंड एवढ्या किंमतीवर सुरू झालेली बोली अवघ्या १३ मिनिटांतच ८.५ दशलक्ष पाऊंड्सला पोहोचली. ८.५ दशलक्ष पाऊंड्स अशा सर्वोच्च बोलीवर या चित्राची विक्री झाली. आवश्यक ते शुल्क जोडले असता ९.९ दशलक्ष पाऊंड्स ही एकूण किंमत झाली. लिलाव करणाऱ्या कंपनीला या छायाचित्राची किंमत दीड ते अडीच दशलक्ष पाऊंड्स एवढी होईल अशी अपेक्षा होती.