महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

हवाप्रदूषणामुळे दरवर्षी होतो ८८ लाख लोकांचा अकाली मृत्यू

ग्रीनपीस या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून नुकताच हवा प्रदूषणाबाबतचा अहवाल सादर केला आहे. हा अहवाल भारतासाठी निराशाजनक आहे. याचे कारण म्हणजे जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांत भारतातील २२ शहरे आहेत. यातही जगातील राजधान्यांमध्ये दिल्लीचा पहिला क्रमांक आहे.

हवा प्रदूषण

By

Published : Mar 13, 2019, 11:51 PM IST

पॅरिस - हवाप्रदूषणामुळे दरवर्षी जगभरात ८८ लाख लोकांचा मृत्यू होतो, असे युरोपमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे. युरोपमध्ये दरवर्षी हवाप्रदूषणामुळे ७ लाख ९० हजार लोकांचा मृत्यू होत असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.

ग्रीनपीस या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून नुकताच हवा प्रदूषणाबाबतचा अहवाल सादर केला आहे. हा अहवाल भारतासाठी निराशाजनक आहे. याचे कारण म्हणजे जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांत भारतातील २२ शहरे आहेत. यातही जगातील राजधान्यांमध्ये दिल्लीचा पहिला क्रमांक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details