लंडन - ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेली 53 हजार 322 नवी प्रकरणे समोर आली आहेत. यासह देशातील एकूण रुग्णांची संख्या 25 लाख 42 हजार 65 वर पोचली आहे. यूकेमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झालेल्या 613 नवीन मृत्यूंसह मृतांची संख्या 74 हजार 125 वर पोचली आहे, अशी माहिती वृत्तसंस्था सिन्हुआने दिली आहे.
ब्रिटनमध्ये कालच 55 हजार 892 नवीन कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळले होते. गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, महामारीमध्ये आतापर्यंत ही देशातील रुग्णसंख्येतील दिवसाला झालेली सर्वाधिक वाढ आहे. तसेच, मागील सलग चार दिवसांपासून दिवसाला 50 हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत.
हेही वाचा -नवीन कोरोना विषाणूचा शिरकाव झालेले फ्लोरिडा हे अमेरिकेतील तिसरे राज्य
ब्रिटिश सरकारच्या सल्लागारांनी नवीन कोविड-19 विषाणू समोर आल्यानंतर याच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यालये, शाळा आणि सर्व गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक केले असताना ही नवीन आकडेवारी समोर आली आहे. हा नवीन प्रकार 70 टक्के वेगाने पसरतो.