पॅरिस - फ्रान्समध्ये पोलीस मुख्यालयाच्या इमारतीत एका कर्मचाऱ्याने केलेल्या चाकू हल्ल्यात ४ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत हल्लेखोरालाही पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारले. पॅरिस शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पोलीस मुख्यालयाच्या इमारतीत गुरुवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली.
हेही वाचा - जादुटोण्याच्या संशयावरुन ओरिसामध्ये सहा जणाचे काढले दात, मानवी विष्ठाही घातली खाऊ
हल्लेखोर कर्मचारी पोलीस मुख्यालयात मागील २० वर्षांपासून काम करत होता. चाकू घेवून बळजबरीनं तो पोलीस मुख्यालयाच्या इमारतीमध्ये घुसला. हल्ल्यामागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत, असे पोलीस विभागाचे सचिव लॉईक ट्रव्हर्स यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितले.
हेही वाचा - बस नदीत कोसळून भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू, ३६ पेक्षा जास्त प्रवासी जखमी
हल्ल्यानंतर पोलीसांनी परिसराला वेढा घातला. तसेच घटनास्थळापासून जवळच असलेले पॅरिस मेट्रो स्टेशन सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवले. या हल्ल्यामध्ये इतर काही व्यक्ती जखमी झाले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.