पॅरीस - फ्रान्समधील साप्ताहिक शार्ली हेब्दोच्या जुन्या कार्यालयाबाहेर आज (शुक्रवार) चार जणांवर चाकू हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर दोन हल्लेखोर पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. यात चौघे जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यगंचित्र काढल्यानंतर शार्ली हेब्दो साप्ताहिक वादत सापडले होते. २०१५ साली साप्ताहिकाच्या कार्यलयावर धार्मिक कट्टरताद्यांनी शसस्त्र हल्ला केला होता. त्यात संपादकासह १२ जणांचा मृत्यू झाला होता.
'शार्ली हेब्दो'च्या जुन्या कार्यालयाजवळ पुन्हा हल्ला, दोघे गंंभीर जखमी - शार्ली हेब्दो साप्ताहिक बातमी
फ्रान्समधील शार्ली हेब्दो साप्ताहिकाच्या जुन्या कार्यालयाबाहेर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबराचे व्यंगचित्र काढल्यानंतर हे साप्ताहिक वादात सापडले होते.
नुकतेच २०१५ साली झालेल्या हल्ल्यातील आरोपींवर खटला सुरू झाल्यानंतर साप्ताहिकाने पुन्हा एकदा प्रषित मोहम्मद यांचे वादग्रस्त व्यंगचित्र काढले होते. त्यानंतर आता शार्ली हेब्दोच्या जुन्या कार्यालयाबाहेर चाकू हल्ल्याची घटना घडली आहे. रिचर्ड लिनियॉर सबवेवर साप्ताहिकाचे जुने कार्यालय असून तेथे पोलीस मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.
या हल्ल्यामागचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. २०१५ साली मुस्लीम कट्टरतावाद्यांनी शार्ली हेब्दोच्या कार्यालयावर हल्ला केला होता. त्यामध्ये १२ जण ठार झाले होते. आताच्या हल्ल्याचा संबंध शार्ली हेब्दोशी आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी हल्लेखोर आणि जखमींची कोणतीही माहिती उघड केलेली नाही. जखमींमधील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.