महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

चाकू हल्ल्यात चार फ्रेंच पोलिसांचा मृत्यू; प्रतिहल्ल्यात हल्लेखोर ठार - फ्रेंच पोलिसांवर चाकू हल्ला

फ्रान्समध्ये पोलीस मुख्यालयाच्या आवारात झालेल्या सशस्त्र हल्ल्यात चार पोलिसांचा मृत्यू झाला. नॉट्रे डेम कॅथेड्रलपासून जवळच असलेल्या पोलीस मुख्यालयाच्या आवारात गुरुवारी दुपारी ही घटना घडली.

परिसराची सुरक्षा वाढवण्यात

By

Published : Oct 3, 2019, 8:36 PM IST

प‌ॅरिस -शहरातील पोलीस मुख्यालयाच्या बाहेर कार्यालयातीलच एका कर्मचाऱ्याने पोलिसांवर चाकूने हल्ला केला. या घटनेत चार पोलिसांचा मृत्यू झाला. फ्रेंच पोलिसांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात हल्लेखोराचादेखील मृत्यू झाला.


नॉट्रे डेम कॅथेड्रलपासून जवळच असलेल्या पोलीस मुख्यालयाच्या आवारात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेनंतर मुख्यालय तत्काळ रिकामे करून परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली.

हेही वाचा - ७०व्या वर्धापन दिनानिमित्त चीनचा जगाला 'संदेश'...


दरम्यान, बुधवारी फ्रेंच पोलिसांनी कर्मचाऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांच्या विरोधात संप पुकारला होता. संपाच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा जीवघेणा हल्ला झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details