महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Mykolaiv Port : युद्धग्रस्त युक्रेनमधील मायकोलायव बंदरात अडकले 21 भारतीय नाविक - युक्रेनमधील युद्धग्रस्त परीस्थिती

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये (war affected ukraine) मायकोलायव बंदरात (Mykolaiv port in Ukraine) पर एका व्यापारिक जहाजावर कमीत कमी 21 भारतीय नाविक अडकले आहेत. परंतु ते सर्व सुरक्षित आहेत आणि आपले कुटुंब आणि जहाज व्यवस्थापन एजन्सी यांच्याशी नियमित संपर्कात आहेत.

Mykolaiv
Mykolaiv

By

Published : Mar 6, 2022, 8:54 AM IST

मुंबई : युद्धग्रस्त युक्रेनमधील मायकोलायव बंदरात ( Mykolaiv port in war hit Ukraine ) 21 भारतीय नाविक अडकल्याची माहिती मिळाली आहे. एजन्सीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय पराशर यांनी ही माहिती दिली. पराशर म्हणाले की 24 इतर जहाजे देखील बंदरावर आहेत आणि त्यात भारतीय नाविक देखील आहेत.

ते म्हणाले की, व्हीआर मेरीटाईम (शिप मॅनेजमेंट एजन्सी) परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्याच वेळी, परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दूतावास आणि क्षेत्र नियामक जहाज महासंचालकांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना परिस्थितीबद्दल अवगत करत आहेत. शिपिंग महासंचालक अमिताभ कुमार यांच्याशी टिप्पणीसाठी संपर्क होऊ शकला नाही. गेल्या महिन्यात रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून चालक दल जहाजातून बाहेर पडलेला नाही आणि जहाजावर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे पराशर यांनी सांगितले.

पराशर म्हणाले की, सध्या जहाज पोर्ट मायकोलिव्ह येथे उभे आहे. आमच्या जहाजासह एकूण 25 जहाजे तेथे आहेत. इतर जहाजांवरही भारतीय नाविक आहेत. जिथं पर्यंत आमच्या जहाजाचा संबंध आहे, सध्या चालक दल आणि जहाज दोघेही सुरक्षित आहेत. तसेच पराशर म्हणाले की, जहाजावर इंटरनेट आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन काम करत आहे. आम्ही सध्या सर्व चालक दल मेंबर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत. तसेच चालक दल स्वतः त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत.

त्यांनी सांगितले की, कंपनीकडे उपलब्ध माहितीनुसार, रशियन सैन्य कदाचित काळ्या समुद्राच्या किनार्‍यावरील बंदराच्या अगदी जवळ आहेत. ते म्हणाले की, जर रशियन सैन्य बंदरावर आले आणि त्यांनी काही जहाजांना जाण्याची परवानगी दिली तर ते ठीक आहे. अन्यथा आम्हाला काही टग बोटी आणि इतर प्रकारच्या सेवांसह बंदर प्राधिकरणाकडून काही मदतीची आवश्यकता असेल, जेणेकरून जहाजे सुरक्षितपणे निघू शकतील.

पाराशर म्हणाले की, जर कंपनीला आपत्कालीन परिस्थितीत आपल्या चालक दलाला बाहेर काढावे लागले, तर सर्वात जवळची पोलंड सीमा 900 किमी दूर आहे आणि कीवमध्ये सुरक्षित ठिकाणी जाणे म्हणजे बंदर शहरापासून 500 किमी प्रवास करणे असेल. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पोहोचणे त्यांना सध्या शक्य नाही. ते म्हणाले की आम्ही खूप सावध आहोत. त्यामुळे बंकरमध्ये किंवा युक्रेनच्या आत कुठेही राहण्यापेक्षा जहाजावर राहणे चांगले आहे.

तरीही कंपनी दररोज भारतीय दूतावासाला स्टेटस रिपोर्ट सादर करत आहे, असेही ते म्हणाले. इंटरनॅशनल वॉटर ट्रान्सपोर्ट फेडरेशन ( International Water Transport Federation ) आणि नॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स ऑफ इंडिया (National Union of Seafarers of India) सारख्या काही इतर एजन्सी देखील या समस्येत सामील आहेत, असेही त्यांनी सांगितले. IWTF कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि NUSI चे सरचिटणीस अब्दुलगानी सेरांग यांच्या मते, त्यांची युनियन या मुद्द्यावर युक्रेनियन समकक्षाशी सतत संपर्कात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details