लंडन - कोरोनामुळे जगभरात आर्थिक मंदी आली आहे. व्यापार बंद असल्यामुळे अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. कोरोनामुळे बंद पडलेल्या व्यवसायांपैकी सर्वात मोठा फटका हा विमान कंपन्यांना पडला आहे.
यातच इंग्लंडच्या ब्रिटिश एअरवेज या कंपनीच्या तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांवरही टांगती तलवार आली आहे. आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी ब्रिटिश एअरवेजने आपल्या कामगार संघटनांना प्रस्तावित पुनर्रचना व रिडंडंसी प्रोग्रामबद्दल औपचारिकरित्या सूचित केले आहे.