महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

जातीयवादी वक्तव्यामुळे मलेशियातील ७ राज्यात झाकीर नाईकला भाषणावर बंदी

मलेशियामध्येही ७ राज्यांनी झाकीर नाईक यांना सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम आणि भाषण देण्यावर बंदी घातली आहे. तसेच त्यांना देण्यात आलेल्या कायम निवासी दर्जावरही पुन्हा विचार केला जाणार आहे.

झाकीर नाईक

By

Published : Aug 20, 2019, 2:31 PM IST

नवी दिल्ली - विवादित मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईक भारतामधून पळून गेल्यानंतर मलेशियामध्ये राहत आहे. मलेशियामध्येही ७ राज्यांनी झाकीर नाईक यांना सार्वजनिक ठिकाणी भाषण देण्यावर बंदी घातली आहे. तसेच त्यांना देण्यात आलेल्या कायम निवासी दर्जावरही पुन्हा विचार केला जाणार आहे.

झाकीर नाईक मागील ३ वर्षांपासून मलेशियामध्ये राहत आहे. मलेशियामधील अल्पसंख्याक हिंदू आणि चीनी अल्पसंख्याकांबद्दल विवादात्मक वक्तव्य केल्याबद्दल त्यांना ७ राज्यांनी सार्वजनिक ठिकाणी भाषण करण्यावर बंदी घातली आहे. मेलेका, जोहोर, सेलेनगोर, पेनांन्ग, केडह, पेरील्स, सर्वाक या ७ राज्यांनी झाकीर नाईक यांच्या भाषणावर बंदी घातली आहे.

मलेशिया सरकारने झाकीर नाईक यांना देशामध्ये कायम निवासाची परवानगी दिली आहे. मात्र, मलेशियाचे माजी पोलीस प्रमुख रिहम नुर यांनी झाकीर यांना देण्यात आलेल्या या सवलतीवर पुन: विचार करण्याची सरकारला विनंती केली आहे.

झाकीर नाईक यांनी जातीयवादी टिपप्णी केली असेल तर त्यांना देण्यात आलेल्या कायम निवासी दर्जावर पुन्हा विचार केला जाईल, असे मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी स्पष्ट केले आहे.

मलेशियातील हिंदुना भारतातील अल्पसंख्यांक मुस्लिमांपेक्षा १०० पटींनी जास्त अधिकार मिळतात, तरीही ते मलेशियाच्या पतप्रधांनाऐवजी नरेंद्र मोदींना पाठिंबा देतात, अशी जातीयवादी टिपण्णी नाईक यांनी केली. वादग्रस्त आणि धार्मिक तेढ पसरवणारे भाषण केल्यामुळे झाकीर नाईकवर भारतामध्ये खटला सुरू आहे. मात्र, झाकीर नाईक यांनी न्यायालयाच्या आदेशानंतरही भारतात येण्याचे टाळले.

ABOUT THE AUTHOR

...view details