महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीवर 100 फूट लांब शार्कच्या हल्ल्यात सर्फरचा मृत्यू - Salt Beach

ऑस्ट्रेलियातील उत्तर न्यू साऊथ वेल्समधली समुद्र किनाऱ्यावर एका 60 वर्षीय सर्फरचा 100 फूट लांब शार्कच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

शार्क
शार्क

By

Published : Jun 7, 2020, 5:03 PM IST

सिडनी - ऑस्ट्रेलियातील उत्तर न्यू साऊथ वेल्समधली समुद्र किनाऱ्यावर एका 60 वर्षीय सर्फरचा 100 फूट लांब शार्कच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. शार्कचा सामना करण्यासाठी बऱ्याच लोकांनी सर्फरला मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा जीव वाचला नाही. शार्कच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अवस्थेत त्याला किंग्सक्लिफमध्ये साल्ट समुद्रकीनारी आणण्यात आले. मात्र, किनाऱ्यावर येताच त्याचा मृत्यू झाला.

व्हाईट शार्कने हा हल्ला केल्याची पुष्टी एका एका शार्क जीवशास्त्रज्ञाने केल्याचे राज्याच्या प्राथमिक उद्योग विभागाने सांगितले. या घटनेनंतर, जलतरणपटू आणि सर्फर आसपासच्या किनाऱ्यावरून हटवण्यात आले आहे. समुद्र किनारा 24 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये शार्कचा तिसरा प्राणघातक हल्ला होता.जानेवारीत पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीजवळ एकाचा मृत्यू झाला होता. तर एप्रिलमध्ये, शार्कने ग्रेट बॅरियर रीफवर एका 23 वर्षीय वन्यजीव कर्मचाऱ्याची शिकार केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details