मॅास्को - जगभरामध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. यातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते डिमिट्री पेस्कोव्ह यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना आयसोलेट केले आहे.
धक्कादायक! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या प्रवक्त्याला कोरोनाची लागण - डिमिट्री पेस्कोव्ह
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते डिमिट्री पेस्कोव्ह यांना करोनाची बाधा झाल्याची माहिती आहे.
यापूर्वी रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या रशियामध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. रशियात आत्तापर्यंत २ लाख ३२ हजार २४३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
चीनमधून कोरोनाच्या प्रसाराला सुरुवात झाली होती. मात्र, आता जगातील १७० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना विषाणू पसरला आहे. महामारी आटोक्यात आणण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. तसेच सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. आर्थिक उलाढाली ठप्प असून लाखो नागरिकांचे रोजगार गेले आहेत. अनेक देश आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत.