काठमांडू -जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळने मात्र, अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत केले. 'व्हिजिट नेपाळ 2020' या मोहिमेची घोषणा करून त्यांनी नवीन वर्षाचे स्वागत केले. या पर्यटन मोहिमेच्या माध्यमातून येणाऱ्या दशकात 20 लाखांपेक्षा जास्त पर्यटकांना नेपाळमध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
नेपाळच्या राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांनी दशरथ स्टेडियमवर एकतेची मशाल लावून या मोहिमेची सुरुवात केली. नेपाळ हा जगातील सुंदर पर्यटन स्थळांमध्ये गणला जातो. पर्यटनाच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था सुरू आहे. आम्ही सुरू केलेल्या पर्यटन मोहिमेतून नक्कीच देशाच्या पर्यटन उद्योगाला चालना मिळेल, असे मत भंडारी यांनी व्यक्त केली.