ढाका -बांग्लादेशात लिंग समानतेच्या दिशेने पाऊल टाकण्यात आले आहे. आतापर्यंत येथील मुस्लीम विवाह कायद्यानुसार महिलांना विवाह प्रमाणपत्रावर कुमारिका आहे किंवा नाही हे जाहीर करणे बंधनकारक होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाने आता ही अट रद्द करण्यात आली आहे. अद्याप यासंबंधीचा नवा कायदा तयार होणे बाकी आहे. मात्र, लिंग समानतेला बळ देणाऱ्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
बांग्लादेश महिलांना विवाह प्रमाणपत्रावर कौमार्य जाहीर करण्याची अट हटवणार - bangladesh news
सध्या न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, 'कुमारी' या शब्दाच्या जागी 'अविवाहित' हा शब्द आणण्यात आला आहे. इतर दोन पर्याय तसेच ठेवण्यात आले आहेत. तसेच, आता पुरुषांसाठीही त्यांची वैवाहिक स्थिती करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
बांग्लादेशातील मुस्लीम विवाह आणि घटस्फोट कायद्यानुसार, महिलांना विवाह प्रमाणपत्रावर त्यांचे कौमार्य तसेच, विधवा किंवा घटस्फोटीत असल्याचेही जाहीर करावे लागते. या प्रमाणपत्रावर कुमारी, विधवा आणि घटस्फोटीत असे पर्याय महिलांसाठी असतात. मात्र, हीच बाब जाहीर करणे पुरुषांसाठी आवश्यक नाही. याविरोधात येथील अधिकारांशी संलग्न संघटनांनी २०१४ मध्ये याचिका दाखल केली होती. ही प्रथा भेदभाव करणारी असून ती बंद करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
सध्या न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, 'कुमारी' या शब्दाच्या जागी 'अविवाहित' हा शब्द आणण्यात आला आहे. इतर दोन पर्याय तसेच ठेवण्यात आले आहेत. तसेच, आता पुरुषांसाठीही त्यांची वैवाहिक स्थिती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. न्यायालयाने दिलेल्या या आदेशाविषयी सर्व नियम आणि कायद्यातील बदल याचे तपशील ऑक्टोबर महिन्यात जाहीर होणार आहेत.