महाराष्ट्र

maharashtra

फिलीपाईन्समध्ये चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 53 वर

By

Published : Nov 14, 2020, 5:24 PM IST

चक्रीवादळानंतर पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या असून विविध भागातील अद्याप 22 नागरिक बेपत्ता आहेत. बुधवार आणि गुरुवारी या वादळाने लुझोन या मुख्य बेटावर कहर माजवला आहे. शोधकार्य अद्याप सुरुच असल्याने मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भूस्खलनाच्या घटना
भूस्खलनाच्या घटना

मनिला- फिलीपाईन्समध्ये वामको चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 53 वर पोहचली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासून फिलीपाईन्सला या वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. शनिवारी पोलिसांनी मृतांबाबतची माहिती दिली. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत करण्याचे आवाहन सोशल मीडियावरून करण्यात येत आहे.

लुझोन या मुख्य बेटावर कहर

चक्रीवादळानंतर पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या असून विविध भागातील अद्याप 22 नागरिक बेपत्ता आहेत. बुधवार आणि गुरुवारी या वादळाने लुझोन या मुख्य बेटावर कहर माजवला आहे. शोधकार्य अद्याप सुरूच असल्याने मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या बचाव पथकाचे लक्ष्य कागायन आणि इसाबेला प्रांतांमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे आहे. रबरी बोटी वापरून पाण्यात अडकलेल्या, घरांच्या छतांवर बसलेल्या रहिवाशांना वाचवण्यासाठी बचावकर्ते दाखल झाले आहेत, अशी माहिती सिन्हुआ वृत्तसंस्थेने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details