काबुल -अफगाणिस्तानात तालिबान्यांची किती दहशत आहे याचा पुरावा देणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. काबुलमधील एका टीव्ही चॅनलमध्ये तालिबानी दहशतवादी मुलाखतीसाठी आले होते. यावेळी टीव्ही अँकरला गन पॉईंटवर ठेवत तालिबान नेत्याने मुलाखत दिली.
हेही वाचा -ऐन स्वातंत्र्यदिनी अफगाणिस्तानमध्ये ठिकठिकाणी स्फोट
- अँकरला गन पॉईंटवर ठेवले -
अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबान स्वतःला बदललत असल्याचे सांगत आहे. मात्र, व्हायरल झालेल्या या व्हिडिओनंतर अफगाणिस्तानातत तालिबानची किती दहशत आहे याचे चित्र पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
न्यूज स्टुडियोमध्ये तालिबान कमांडरची मुलाखत सुरू होती. यावेळी इतर तालिबानी दहशतवादी बंदुका घेऊन मुलाखत होईपर्यंत तिथेच अँकरच्या मागे उभे होते. या व्हिडिओवरुन अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती कशी असेल याचा अंदाज लाऊ शकतो.
हेही वाचा -काबूलमध्ये काय घडलं? अफगाणिस्तानातून भारतात सुखरूप परतलेल्या सविता शाही यांचा थरारक अनुभव